राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी अर्जास 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी दि. 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार लाभार्थींना दरमहा रु. 5,000 इतके मानधन प्रदान करण्यात येते. सदर योजना दि. 1 जुलै 2026 पासून महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत आपले सरकार पोर्टलवर कार्यान्वित करण्यात आली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली होती.500मात्र, राज्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने साहित्यिक व कलावंत ऑनलाइन अर्ज सादर करीत असल्याने पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अनेक पात्र अर्जदारांना अर्ज सादर करताना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. या बाबीचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पात्र साहित्यिक व कलावंतांच्या सोयीसाठी अर्ज सादर करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समिती जिल्हा परिषद सोलापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या