३१ जुलै रोजी सोलापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्या वतीने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित उद्योगांमधील ३७८ पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी १० उद्योग सहभागी होणार आहेत.
या रोजगार मेळाव्यात अमेझॉन वेअर हाऊस असोसिएट, हेल्पर, केमिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन, सीएनसी ऑपरेटर, आयटीआय फिटर, आयटीआय इलेक्ट्रिशियन तसेच दहावी, बारावी (विज्ञान), बी.एस्सी./एम.एस्सी. केमिस्ट्री, पदवी, डिप्लोमा आणि पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांसाठी विविध रोजगार संधी उपलब्ध आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपल्या रिझ्युमच्या तीन प्रती तसेच आवश्यक कागदपत्रांसह शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट पार्क चौक, सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ०२१७-२९९२९५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी HTTPS://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, सौ.संगीता खंदारे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांनी केले आहे.





