मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिरास प्रारंभ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

रायगड-अलिबाग, दि. २२ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, अलिबाग-रायगड यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिराचा उद्घाटन समारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हे आरोग्य शिबिर दि. २२ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, नागरिकांना विविध आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.500शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुरी कांबळे, शिबिराचे नोडल अधिकारी डॉ. संतोष हराळकर, डॉ. सुधाकर बंटेवाड तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, समाजसेवा अधीक्षक, परिचारिका, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे सांगत आजारांचे लवकर निदान व वेळेवर उपचार होण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक नागरिकाने नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत जिल्हाभर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरात रक्तदान शिबिर, स्तन कर्करोग तपासणी, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी तसेच नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.500या सर्व सेवा संबंधित विभागांमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी शिबिराबाबत समाधान व्यक्त करून प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. “आपले आरोग्य… आमची जबाबदारी…” या घोषवाक्याला साजेसा हा उपक्रम समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या