आयनक्लस्टरच्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयाचे 19 जून रोजी भव्य उद्घाटन; श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचेही दर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : अत्याधुनिक Alkaline Water Ionizer क्षेत्रात कार्यरत असलेल्या IONCLUSTER या कंपनीच्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयाचे भव्य उद्घाटन शुक्रवार, दि. 19 जून 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता पुणे येथे होणार आहे. या सोहळ्यानिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे दर्शन भाविकांना घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास उद्योग, व्यवसाय, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपकभाऊ मानकर, दिलीपजी ओंबे (इंटरनॅशनल बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट अँड कोच) तसेच अजयजी पुरकर (सिने अभिनेते व निर्माते) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अक्कलकोट वटवृक्ष मंदिराचे प्रमुख पुजारी पद्मश्री मंदार (महाराज) मोहन पुजारी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाला सचिनभाऊ थिटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, IONCLUSTER, SS Net Link आणि Omnitrix Technologies यांच्या संयुक्त विद्यमाने या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनानंतर सायंकाळी 7 वाजल्यापासून उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन कॉर्पोरेट कार्यालयाच्या माध्यमातून IONCLUSTER कंपनीच्या विस्ताराला आणि ग्राहक सेवेला नवी दिशा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचा तपशील
दिनांक : शुक्रवार, 19 जून 2026
वेळ : सायंकाळी 6.30 वाजता
स्थळ : ई-विंग, फ्लॅट क्र. 002, भाटकरा अपार्टमेंट, डीएसके विश्व, धायरी, पुणे – 411041
उद्योग, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याकडे पुणेकरांचे लक्ष लागले असून, मोठ्या संख्येने नागरिक व भाविक उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




