महाराष्ट्रसोलापूर

सोलापुरात चार दिवस ‘ड्राय डे’; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूविक्री बंद..

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील संबंधित भागांमध्ये चार दिवस दारूविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जारी केले आहेत.

निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १८ जून २०२६ रोजी मतदान तर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.509आदेशानुसार, सोलापूर महानगरपालिका हद्द, कुर्डूवाडी, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज नगरपरिषद क्षेत्रातील सर्व मद्यविक्री दुकाने, बार, क्लब व संबंधित अनुज्ञप्तीधारक आस्थापना १६ जून रोजी दुपारी ४ वाजल्यापासून बंद राहतील. १७ जून रोजी संपूर्ण दिवस तसेच १८ जून रोजी मतदान संपेपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत दारूविक्रीस बंदी राहणार आहे.5000याशिवाय, सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मद्यविक्री आस्थापना २२ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ५४ व ५६ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार संबंधित परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाईही केली जाऊ शकते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button