लायन क्लब बार्शी रॉयल च्या अध्यक्षपदी मंगेश बागुल यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : लायन क्लब ही इंटरनॅशनल संघटना आहे, ही संघटना संपूर्ण जगात 24 तास सेवा कार्य करत आसते, या संघटनेचा सदस्य होणे सुद्धा खूप मोठा मानाचा सन्मान समजला जातो. समाजामध्ये या संघटनेच्या सदस्याला खूप मान सन्मान मिळतो, गरजू गरजवंत समाजापासून दूर गेलेल्या लोकांना प्रवाहात आणण्याचे काम लायन क्लब सारख्या संघटना आहो रात्र काम करत असतात.
अशा या संघटनेचे गेले दहा वर्षापासून मंगेश बागुल हे सभासद असून गेल्या दोन वर्षांपूर्वी लायन्स क्लब बार्शी रॉयल चे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात बार्शी तालुका व्यसनमुक्ती अभियान पूर्ण तालुक्याभर राबविण्यात आला होता.
तसेच तिरुपती ऍग्रो एजन्सीजचे संचालक व ग्रोटेक ॲग्री सायन्स चे रिजनल मॅनेजर म्हणून काम बघत आहे तिरुपती ऍग्रो एजन्सीज मधून दरवर्षी ला गरजवंत शेतकऱ्यांना मोफत बियाणं किंवा औषधाचा वाटप केले जाते आतापर्यंत त्यांच्या मार्फत तालुक्यातील व जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना कृषीचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
तसेच सेक्रेटरी म्हणून ला. दयानंद रेवडकर मुख्याध्यापक उपले दुमाला व ट्रेझरर म्हणून ला. उमेश जाधव इंजिनियर यांची निवड करण्यात आली
या निवड प्रक्रियेमध्ये नॉमिनेशन कमिटी चेअरमन ला वर्षा खांडवीकर माजी अध्यक्ष ला एम जे एफ संतोष गुळमिरे ला अमित कांकरिया यांनी काम पाहिले ही सर्व निवड प्रक्रिया ला डॉ. तेजस लाड यांच्या उपस्थितीत झाली. क्लबचे आयकॉन व मार्गदर्शक ला PDG जितेंद्र दोशी, MJF ला राहुल दोशी, ला गणेश भंडारी, ला संजय खांडवीकर, ला सुनिल पाटील,ला मनोज पाटील, ला शशिकांत बारबोले,ला राजेश खाडे, ला राजेंश चांगभले, ला डॉक्टर निनाद माढेकर ला. मनिष रुगले, ला अमोल गुंडेवार तसेच सर्व ला. महिला व सर्व पुरुष मेंबर उपस्थित होते.




