क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत ‘निर्भया पथका’ची धडक कारवाई: कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा, 2.56 लाखांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : बार्शी उपविभागातील निर्भया पथकाने आज बार्शी शहरातील कुर्डुवाडी रोडवरील पोस्ट चौकात अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. या छाप्यात रोख रक्कम आणि साहित्यासह एकूण 2,56,299 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोहेका हनुमंत पाडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक बार्शी शहरात पेट्रोलिंग करत होते. दुपारी 2:30 वाजता गोपनीय माहिती मिळाली की, कुर्डुवाडी रोड पोस्ट चौक येथील अतुल नवगन यांच्या पत्राशेडमध्ये 4-5 लोक येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून ‘कल्याण/मुंबई’ मटका खेळवत आहेत.590पत्राशेडमध्ये अतुल मोहन नवगन (45), दत्तात्रय गंधे (21), शरीफ तांबोळी (57) व शंकर लोखंडे (42) हे जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. पंचांसमक्ष अंगझडतीत 39,599 रु. रोख, 10 मोबाईल हँडसेट, 6 प्रिंटर, मोबाईल कीबोर्ड, कॅम्प्युटर कीबोर्ड, फोन पे स्कॅनर, गणकयंत्र, रबरी शिक्के, मटक्याचे आकडे लिहिलेली फळे, पावती पुस्तके व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मोबाईलमध्ये सॅमसंग, रिअल मी, अॅपल व व्हिवो कंपनीचे फोन आहेत.5000चौकशीदरम्यान अतुल नवगन याने सदरचा मटका लखन सुभाष विघ्ने रा. खुरपे बोळ, बार्शी याच्या सांगण्यावरून चालवत असल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी अतुल नवगन, दत्तात्रय गंधे, शरीफ तांबोळी, शंकर लोखंडे व लखन विघ्ने अशा 5 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोहेका बाबासाहेब घाडगे यांनी पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला. बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button