तर पिकविमा कंपनीच्या काचा लवकरच वेचू…. शंकर गायकवाड यांनी दिला गर्भित इशारा

चिखर्डे येथे शेतकरी सभेला मार्गदर्शन करताना शंकर गायकवाड व समोर शेतकरी दिसत आहेत.
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : १५ मे २०१६ पासून विविध कार्यालयावरती पिक विम्यासाठी शेकडो आंदोलने करण्यात आली, त्यापैकी अनेक वेळा कार्यालयाच्या काचा वेचून आंदोलने करण्यात आली, परंतु दरवेळी फक्त आंदोलनात आलेल्या शेतकऱ्यांनाच योग्य रक्कम मिळाली परंतु राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मात्र पिकविमा नुकसान भरपाई खूप कमी दिली गेली तर न भांडणाऱ्या शेतकऱ्यांची अक्षरशः “लुटली गेली!” ती वसूल करण्यासाठी व चालू वर्षी राज्यातील अनेक तालुक्यांना पिक विम्यातून वगळण्यात आल्यामुळे, २५ मे पासून संबंधित लुटारू पिकविमा कंपन्यांसह शासकीय कार्यालयाच्या काचा पूर्वीपेक्षा जास्त वेचून विमा भरपाई व्याजासह वसूल करण्यात येईल असा गर्भित इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी चिखर्डे, तालुका बार्शी येथे झालेल्या जाहीर सभेतून दिला. तसेच राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पिकविमा कंपन्यांकडे नुकसान भरपाई येणे बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.
त्यावेळी युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शरद भालेकर, माढा तालुका अध्यक्ष विलास दोलतडे, जिल्हा संघटक सचिन आगलावे, जीवन गावडे, प्रकाश पाटील, प्रशांत काळदाते, सुधीर सवणे, रघुबप्पा कोंढारे, ज्ञानदेव कोंढारे, अशोक कोंढारे, सुभाष देवकर, पल्लव गाढवे, संतोष दळवी, बापू जाधव आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेची शपथ देण्यात आली. शरद भालेकर व पाल्लव गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दोलतडे यांनी केले तर आभार जीवन गावडे यांनी व्यक्त केले.




