भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळीचा दहावी निकाल शंभर टक्के

0

सलग १९ वर्षे उज्वल यशाची परंपरा कायम

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : अभिजीत शिक्षण प्रसारक मंडळ, ज्योतिबाचीवाडी (ता. बार्शी) संचलित भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, गुळपोळी येथील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला असून विद्यालयाने सलग १९ वर्षे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून विद्यालयाचा नावलौकिक अधिक वाढला आहे.500प

यंदाच्या परीक्षेत विद्यालयातील एकूण ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर १४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. संजना काळे हिने ९३.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. समर्थ शिंदे याने ९३ टक्के गुणांसह द्वितीय, तर चैतन्य सुतार याने ९२.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

5000तसेच प्रेम परमेश्वर मचाले (८८%), कु. सानिका भोईटे (८७.६०%), कु. तेजस्विनी चौधरी (८७%), कु. साक्षी नरखडे (८५.८०%), कु. सुलक्षणा घोडके (८५.४०%), सम्यक चौधरी (८५.२०%), शिवाजी चिकणे (८४.६०%), श्रेयश काळे (८४.६०%), राजमहेंद्र चिकणे (८३.२०%), आदित्य चिकणे (८२.८०%), कु. संचिता ठाकरे (८१.८०%), सुधांशु राऊत (८१.८०%), श्रेयश राऊत (८१.२०%), कु. ज्ञानेश्वरी चिकणे (८१%), कु. मानसी कावरे (८०.८०%) आणि कु. सृष्टी नगरकर (८०.६०%) यांनीही उल्लेखनीय यश मिळविले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक प्रमोद देशमुख सर, संस्थेचे अध्यक्ष अरुणभाऊ कापसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी केले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या