अहिल्यानगरमहाराष्ट्रसत्कार

कुशाबा पिसे अपर कोषागार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त – कोषागार कार्यालयामार्फत निरोप

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

​अहिल्यानगर, दि. ७ : जिल्हा कोषागार कार्यालय, अहिल्यानगर येथील अपर कोषागार अधिकारी कुशाबा पिसे ३० एप्रिल २०२६ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल, कोषागार कार्यालयात आयोजित एका विशेष समारंभात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व नेतृत्वगुणसंपन्न अधिकारी म्हणून त्यांनी विविध विभागांत उल्लेखनीय सेवा बजावली.5000पिसे यांनी जळगाव, अमळनेर, धुळे, अकोले, संगमनेर, कर्जत तसेच समाजकल्याण कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे विविध पदांवर कार्यरत राहून प्रशासकीय कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी नाशिक विभागात मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रम यशस्वीपणे राबवून तांत्रिक विभागात तृतीय क्रमांकाचे पारितोषिकही प्राप्त केले होते.5000या निरोप समारंभात पिसे यांना सेवापूर्तीबद्दल गौरविण्यात आले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, प्राचार्य भास्कर शितोळे यांच्यासह वित्त विभागातील अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. समारंभात उपस्थितांनी पिसे यांच्या कार्यशैलीचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button