आंदोलनबार्शीमहाराष्ट्र

बार्शी बस स्थानकातील गैरसोयींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आंदोलन; तात्काळ सुधारणा करण्याची जोरदार मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बस स्थानकावर असलेल्या विविध समस्या आणि प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) यांच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून बस स्थानक परिसरातील प्रचंड मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधण्यात आले असून, हे खड्डे तात्काळ बुजवून काँक्रिटीकरण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

याशिवाय, बस स्थानक परिसरात नियमितपणे स्वच्छतेची व्यवस्था ठेवावी, प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांची स्थिती सुधारावी, आणि ग्रामीण भागातून बार्शी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्शी बस स्थानक ते शिवाजी कॉलेजदरम्यान जोडपास सेवा सुरू करावी, अशा अनेक मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनापुढे मांडण्यात आल्या.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णराज बाराबोले, जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल पटेल, माजी नगरसेवक सुनील जावळी, ओबीसी शहराध्यक्ष नितीन भोसले, शिवशंकर ढवण, युवक तालुका अध्यक्ष विजय अडसूळ, युवक शहराध्यक्ष आदेश वाणी, शहर उपाध्यक्ष मनोज मोरे, तसेच कार्यकर्ते रवी थोरात, सुमित खुरंगुळे, हनुमंत साळुंखे, भास्कर बागडे, सूर्या मस्के, ऋषिकांत पाटील, बाळासाहेब गांजे, बंडू पिंगळे, प्रथमेश बोंडवे, प्रथमेश गवळी, भाऊ गोडगे, राजेंद्र मुळे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सुविधा उभारणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता प्रशासनाकडून तात्काळ कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button