तरुणांसाठी सुवर्णसंधी! जवळेकर अकॅडमीत पोलिस बॅन्ड प्रशिक्षणाला सुरुवात

0

जवळेकर पोलिस बॅन्ड म्युझिक अकॅडमीचा मार्गदर्शन वर्ग सुरू; १ जूनपासून नवीन बॅच

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बारामती : पोलिस व आर्मी बॅन्डमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी बारामती येथील जवळेकर पोलिस बॅन्ड म्युझिक अकॅडमीतर्फे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला असून, नवीन बॅच दि. ०१ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील इच्छुक तरुणांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.

अकॅडमीमार्फत आगामी काळात होणाऱ्या सुमारे २००० पदांच्या बॅन्डमन भरतीसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, उंची कमी असणे किंवा बारावी उत्तीर्ण नसणे यांसारख्या अटींमुळे मागे पडलेल्या, मात्र पोलिस दलात काम करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.5000या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना कन्सर्ट फ्लूट, क्लॅरनेट, अल्टो सॅक्सोफोन, बिगुल, ट्रम्पेट, ट्रॉम्बोन, युफोनियम यांसारख्या वाद्यांचे सखोल व प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक वाद्याचे मूलभूत ज्ञान ते प्रगत स्तरापर्यंत मार्गदर्शन केले जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार स्वतंत्र पॅकेजेस तयार करण्यात आले असून, मुली व मुलांसाठी वेगवेगळ्या शुल्क रचना ठेवण्यात आल्या आहेत.

अकॅडमीची प्रशिक्षण केंद्रे पुणे, बारामती, भिगवण, अंथुर्णे, कळंब, भुम, परांडा या ठिकाणी कार्यरत असून, आठवड्यातून दोन तासांचे नियमित प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच प्रशिक्षण घेणेही विद्यार्थ्यांना सुलभ होणार आहे.50000

अकॅडमीची वैशिष्ट्ये :

३ महिन्यांचा संरचित प्रशिक्षण कालावधी

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र

अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

प्रत्यक्ष वाद्यांवर प्रात्यक्षिक प्रशिक्षण

मर्यादित कालावधीत प्रवेश घेणाऱ्यांसाठी विशेष लाभ

दरम्यान, प्रवेश प्रक्रिया दि. १० मे २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून, मर्यादित जागा असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन अकॅडमीकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी प्राध्यापक/संस्थापक एस. बी. जवळेकर यांच्याशी संपर्क साधावा.
📞 मोबाईल : 9960403791 / 9423229483

पत्ता : देवगिरी करिअर अकॅडमी, जळोची, लाकडी रोड, बारामती

5099

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या