महाराष्ट्रसोलापूर

विठुरायाच्या चरणी मुस्लिम युवकाचं अनोखं श्रद्धांजली अर्पण — एक लाखाचा मुकुट अर्पण करत भावनिक श्रद्धा

B1न्यूज मराठी नेटवर्क

पंढरपूर | ३० जून २०२५: पंढरपूरातील विठ्ठल मंदिरासाठी दगड फोडण्याचे काम करणाऱ्या गनी सय्यद या मुस्लिम युवकाने आपल्या कार्यस्थळीच असलेला देव मानून पांडुरंगाच्या चरणी तब्बल एक लाख रुपये किमतीचा रौप्याचा मुकुट अर्पण करून एक अनोखा आदर्श घालून दिला आहे.

कामादरम्यान निर्माण झालेल्या श्रद्धेमुळे गनी सय्यद यांनी स्वतःहून हा मुकुट विठोबाच्या मंदिरात अर्पण केला. “मंदिराचे काम करत असताना पांडुरंगाशी एक वेगळी नाळ जुळली. हे केवळ काम नव्हते, तर ती एक सेवा वाटली,” असे गनी सय्यद यांनी सांगितले.

सामाजिक सलोखा आणि धार्मिक सहिष्णुतेचा अनोखा संदेश देणाऱ्या या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. विविध धर्मांतील व्यक्तींनी एकमेकांच्या श्रद्धास्थानांप्रती दाखवलेला सन्मान आणि आदर महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध संस्कृतीची जिवंत साक्ष देतो. या घटनेमुळे ‘माणुसकी हाच खरा धर्म’ हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button