अकोलाप्रशासनमहाराष्ट्र

विनापरवाना जैव उत्प्रेरक विक्री व साठवणूक; कृषी विभागाची कारवाई , 92 लक्ष रू. चा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

अकोला, दि. २० : अकोला येथे विनापरवाना जैव उत्प्रेरक विक्री व साठवणूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून अकोला कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने सखोल तपासणी करून संबंधित ठिकाणी छापा मारला व ९२ लक्ष रू. चा मुद्देमाल जप्त केला.

कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, कृषी अधिकारी (गु. नि.) सुधाकर खंडारे, कृषी अधिकारी रोहिणी मोघाड, पंकज जगताप, पंकज झरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.500फिर्यादी कृषी गुणनियंत्रण अधिकारी यांच्या तक्रारीवरून अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत एकूण 27 प्रकारचे जैव उत्प्रेरक ( 3827 लिटर व 31 हजार 141 किलो ) असा एकूण 92 लक्ष 5 हजार 500 रू. रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 व खत नियंत्रण आदेश 1985 नुसार ही कारवाई करण्यात आली.500जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, संचालक (निवगुनि) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ मुरली इंगळे, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, कृषी अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पूर्ण झाली. पोलीस अधिकारी (आयपीएस) ईशा आनंद यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. 500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button