‘भगवंत महोत्सवा’ मध्ये घुमणार बार्शीतील स्थानिक कलाकारांचा सूर आणि ताल ; १२ एप्रिलला होणार निवड चाचणी!

0

शहर व तालुक्यातील जास्तीतजास्त कलाकारांनी सहभाग नोंदवावा – लोकनेते मा. आ. राजेंद्र राऊत

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंत यांच्या प्रकट दिनानिमित्त ‘श्री भगवंत महोत्सव २०२६’ च्या निमित्ताने स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्थानिक कलाकारांची ‘निवड चाचणी’ रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी, सकाळी १०:०० वाजता, स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तसेच बार्शी शहर आणि तालुक्यातील जास्तीत जास्त कलाकारांनी या निवड चाचणीत सहभागी होऊन आपल्या कलेचे सादरीकरण करावे, असे आवाहन भगवंत महोत्सवाचे प्रणेते लोकनेते मा. आ. राजेंद्र राऊत यांनी केले आहे.5000केवळ १२ एप्रिल रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कलाकारांचाच निवडीसाठी विचार केला जाईल. त्यानंतर येणाऱ्या कलाकारांना संधी दिली जाणार नाही. ​निवड झालेल्या कलाकारांना रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी, सायंकाळी ६:३० वाजता होणाऱ्या मुख्य महोत्सवात आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तरी ​बार्शीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या महोत्सवात आपल्यातील सुप्त गुण दाखवण्यासाठी ही एक मोठी संधी असून, जास्तीत जास्त कलाकारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या