क्राईमबार्शीमहाराष्ट्र

जागेच्या वादातून बार्शीत ज्येष्ठ नागरिकावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : शहरात जागेच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकावर लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती , आबासाहेब शामराव जराड (वय ६५, रा. फुले प्लॉट, बार्शी) हे सध्या सुविधा हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना त्यांनी दिलेल्या जबाबावरून ही घटना उघडकीस आली आहे.5000दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास, ढगे मळा परिसरात जागेच्या कारणावरून वाद झाला. या वादातून सतीश श्रीमंत आरगडे व संजय आरगडे (दोघे रा. बार्शी) यांनी संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ केली व हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केली.5000यावेळी आरोपी सतीश आरगडे याने जवळील लाकडी दांडका उचलून फिर्यादीच्या हात, पाय व पाठीवर वार करून त्यांना जखमी केले. तसेच या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सोनमाळी करत आहेत.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button