बापाचं कष्टाचं लेकीनं केलं सोनं! फपाळवाडीच्या लेकीची पोलीस दलात झेप; ‘वूशू’ चॅम्पियन नेहा घाडगे आता खाकी वर्दीत!

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

​बार्शी : बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथील एका सामान्य कुटुंबातील कन्येने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. आडत मुनीम म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे चीज करत नेहा रामचंद्र घाडगे हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत नेहाने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.5000
​नेहाचे प्राथमिक शिक्षण फपाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण खामगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी तिने बार्शीतील बी. पी. सुलाखे महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण घेत असतानाच नेहाची पावले खेळाकडे वळाली आणि इथूनच तिच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली.

पदवी शिक्षण घेत असताना नेहाला ‘वूशू’ (Wushu) या मार्शल आर्ट्स प्रकारातील खेळाची ओढ लागली. या खेळात तिने प्रचंड मेहनत घेतली आणि विविध स्पर्धांमध्ये सुवर्णपदक (Gold Medal) पटकावून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. खेळातील हीच शिस्त आणि शारीरिक चपळता तिला पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.5000
​नेहाच्या या यशात तिचे आई-वडील खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. अभ्यासासोबतच मैदानी चाचणीसाठी तिने कठोर परिश्रम घेतले. तिला या प्रवासात अनेक गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये ​क्रीडा मार्गदर्शक म्हणून ज्योतिर्लिंग स्पोर्ट क्लबचे जाधव सर आणि जावळे सर. ​मैदानी सरावाचे(Ground) चंद्रशेखर म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले तर मिथिलेश दीक्षित सरांच्या ‘श्री अकॅडमी’मध्ये तिने लेखी परीक्षेचे बारकावे आत्मसात केले.

​आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना नेहा म्हणाली की, “माझ्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी माझ्या शिक्षणात आणि स्वप्नांत कधीही अडथळा येऊ दिला नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि माझ्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज खाकी वर्दी परिधान करू शकले आहे. माझ्या या यशाचे श्रेय माझे आई-वडील, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींना जाते.”

​कौतुकाचा वर्षाव: नेहाच्या या निवडीबद्दल फपाळवाडी ग्रामस्थांकडून तिचे विशेष कौतुक होत असून, एका सामान्य आडत मुनीमाच्या लेकीने खाकी वर्दी मिळवून गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या