सोलापूर : नवीन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेय

0

कुमार आशीर्वाद नागपूरचे जिल्हाधिकारी

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे पत्र सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढले.5000तब्बल पावणेतीन वर्ष सोलापूरचे कामकाज पाहताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरात सेवा बजावली आहेत. आषाढी वारी यशस्वी करताना सोलापूरचे विमानतळचा प्रश्न त्यांनी सोडवून विमानसेवा सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. 5000सीना नदीला आलेला महापूर त्यांनी संवेदनशीलपणे हाताळला. त्याचबरोबर आयटी पार्क साठी ही त्यांनी झोकून देऊन काम केले. यासह प्रशासनामध्ये शिस्त लावली. पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे हाताळत तो शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला आहे.5000कार्तिकेयन हे २०२० बॅचचे भाप्रसे आधिकारी आहेत. याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, नांदेड येथे सेवा बजावली आहे. कार्तिकेयन हे सनदी लेखापाल (Chartered accountant) आहेत. सध्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या