महाराष्ट्रयोजनासोलापूर

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी एमपीएससी पूर्वतयारी अर्थसहाय्य योजना

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर : पुणे येथील महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या तयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे.5000
या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रु. १०,०००/- व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी रु. ५,०००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सन २०२५-२६ मध्ये एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ एप्रिल २०२६ आहे.
5000
अमृत तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षित गटातील, (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी, इत्यादी) उमेदवारांना ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य’ योजना राबविण्यात येत आहे.
5000
या योजनेविषयी सर्व सूचना व माहिती केवळ अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. अर्ज प्रक्रियेसंबंधी शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.
5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button