क्राईमबार्शीमहाराष्ट्र

मयत मुलाच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून शेतकऱ्याच्या खात्यातून अडीच लाखांची फसवणूक

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बँक खात्याशी संलग्न असलेल्या मयत मुलाच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.500याबाबत कळंबवाडी (आ), ता. बार्शी येथील शेतकरी परमेश्वर नामदेव रणदिवे (वय 65) यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, रणदिवे यांनी २३ जून २०१७ रोजी आय.डी.बी.आय. बँक, आगळगाव शाखेत खाते उघडले होते. त्यावेळी स्वतःकडे मोबाईल नसल्याने त्यांनी आपल्या मुलगा सौरभ रणदिवे याचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडला होता. दरम्यान, सौरभ रणदिवे यांचे ४ सप्टेंबर २०२३ रोजी निधन झाले. त्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांक वापरात नव्हता.5000६ ऑगस्ट २०२५ रोजी रणदिवे बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या खात्यातील रक्कम शून्य असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर बँक स्टेटमेंट तपासले असता, संबंधित मोबाईल क्रमांक दूरसंचार कंपनीने बंद करून दुसऱ्या व्यक्तीस देण्यात आल्याचे समोर आले.

तपासादरम्यान सदर मोबाईल क्रमांकाचा वापर करून फोनपे, गुगल पे यांसारख्या डिजिटल व्यवहार माध्यमांतून ४ सप्टेंबर २०२३ ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रणदिवे यांच्या खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय २,५०,००० रुपये काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले.5000या प्रकरणात समाधान काशीनाथ भिल्ल (पत्ता अज्ञात) या व्यक्तीने संबंधित मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून फसवणूक व अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीतही या व्यक्तीने रक्कम काढल्याची बाब समोर आल्याने रणदिवे यांनी त्याच्याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली आहे.5000पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षिततेबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button