कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयाने केली साहित्याची गुढी उभी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय येथे गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे औचित्य साधून ग्रंथालयातील उपलब्ध वैविध्यपूर्ण साहित्याची गुढी उभारून वाचन संस्कृती व वाचन संस्कार जोपासना करण्याचा संदेश देण्याचा गरजेचा नि अनोखा प्रयत्न करण्यात आला.5000गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसून तो नवचैतन्य नवसंकल्प आणि नवविचारांचा उत्सव आहे आपण गुढी उभारून विजय समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक उंचावतो तसेच आपण आज ग्रंथसंपदेची गुढी उभारुन ज्ञान, संस्कार आणि विचारांची उंची वाढवण्याचा संकल्प करुया, रोज थोडं थोडं वाचूया आणि आयुष्यभर मोठे होऊया, ज्ञानाची गुढी उभारु अज्ञान दूर सारु, ग्रंथसंपदेची गुढी ज्ञानाची खरी उंची, जशी गुढी उंच उभारली जाते तशीच आपल्या विचारांची उंची वाढविण्यासाठी वाचनाचा आधार घेवूया,ग्रंथ हेच आपले खरे गुरु आहेत. 5000त्यांच्या सहवासात राहुन आपण अधिक सक्षम,समृद्ध आणि सजग नागरिक बनूया, मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या गर्दीत पुस्तकांची मैत्री टिकवणे ही खरी संस्कृती जपण्याची जबाबदारी आहे .असा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. असे ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी नमूद केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बप्पा सुतार,श्याम जानराव, राहुल लोंढे, प्रेम अग्रवाल, हर्षद देशमुखे, प्रेम लोंढे आधी उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या