पत्रकार विषयकबार्शीमहाराष्ट्रसत्कार

डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून दिल्याबद्दल, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने राजा माने यांचा सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अनेक संपादक व पत्रकार डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये अविरतपणे पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत राज मान्यता नव्हती. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी शासनदरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे डिजिटल मीडियाला अखेर 3 जून रोजी अधिकृत घोषणा होऊन राजमान्यता प्राप्त झाली.

डिजिटल मीडियाचे संस्थापक राजा माने यांच्या प्रयत्नाला मोठे यश आल्यामुळे, हजारो डिजिटल मीडियातील संपादक व पत्रकारांना मोठी सुवर्णसंधी प्राप्त झाली असून लवकरच डिजिटल मीडियाला शासनाच्या अधिकृत जाहिराती चालू होणार असल्याचे राजा माने यांनी म्हटले.

डिजिटल मीडियाला मिळालेल्या याच्याबद्दल, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा सन्मान बार्शी तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश मेटकरी, जिल्हा उपाध्यक्षा वैशाली ढगे, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, सचिव किरण माने, खजिनदार सिद्धार्थ बसवंत, कार्यकारिणी सदस्य अक्षय बारंगुळे, पत्रकार विजय निलाखे, पत्रकार मल्लिकार्जुन धारूरकर, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button