क्रीडा विषयकदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबई

T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय, न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारत जेतेपदावर नाव कोरले

विश्वविजेता! भारताचा दणदणीत विजय…

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 255 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडला फायनल सामन्यात 159 धावा करु शकले. भारतीय संघाने फायनल सामना 96 धावांनी जिंकला. फायनल सामना जिंकताच भारतीय संघाने इतिहास रचला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवत विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत 255 धावांचा विक्रमी डोंगर उभा केला, तर गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडचा डाव कोसळवला. या दणदणीत विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकत क्रिकेटविश्वात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.

संजू जिंकलंस भावा! भारत आणि न्यूझीलंड फायनल सामन्यामध्ये सलामीवीर संजू सॅमसन याने ८९ धावांची वादळी खेळी करत वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. संजू सॅमसने अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. गौतम गंभीर, रोहित शर्मा, विराट कोहली या सर्वांचे त्याने विक्रम मोडलेत. संजूला शतक करायचं असतं तर तो सहज करू शकला असता पण त्याने कसलाही स्वार्थ न पाहता आक्रमत पवित्रा कायम ठेवला.

5000वरूण चक्रवर्तीच्या स्पेलमधील पहिल्या षटकात दोन षटकार लगावले. पण वरूणने स्पेलमधील दुसऱ्या षटकात त्याने टीम सेफर्टला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.

भारतीय डावात संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत ४६ चेंडूत ८९ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माने अवघ्या २१ चेंडूत ५२ धावा करत तुफानी खेळी केली आणि केवळ १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. तसेच इशान किशनने २५ चेंडूत ५४ धावा करत भारताच्या धावसंख्येला अधिक भक्कम स्वरूप दिले.

२५६ धावांचे मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघावर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक आणि धारदार मारा करत दबाव निर्माण केला. जसप्रीत बुमराहने अत्यंत भेदक गोलंदाजी करत ४ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्याचबरोबर अक्षर पटेलने ही ३ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली, तर वरुण चक्रवर्ती आणि गोलंदाजांनीही शिस्तबद्ध गोलंदाजी करत न्यूझीलंडला मोठी भागीदारी उभारू दिली नाही.

भारताच्या क्रिकेट इतिहासात आणखी एक सुवर्णक्षण नोंदवला गेला आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ICC पुरुष T20 विश्वचषकाचा तिसरा किताब आपल्या नावावर केला. या विजयानंतर देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अंतिम सामन्यात भारताने उत्कृष्ट सर्वांगीण खेळ दाखवत न्यूझीलंडला कडवी झुंज दिली. फलंदाजांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या तर गोलंदाजांनी निर्णायक क्षणी विकेट्स घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला. या ऐतिहासिक विजयामुळे भारताने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.50000

भारतीय संघाने इतिहास रचला तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला. तर घरच्या मैदानावर टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला.

जसप्रीत बुमराह – सामनावीर , संजू सॅमसन – स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button