श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

0

डॉ. अब्दुल कलाम यांच्या बरोबरचे क्षण संस्मरणीय : डॉ. व्यंकटेश गंभीर

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील विज्ञान मंडळाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त “आधुनिक तंत्रज्ञान व संधी” या विषयावर दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. ए. बी. शेख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. व्यंकटेश गंभीर, वरिष्ठ संशोधक व माजी संचालक, विज्ञान केंद्र, सोलापूर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे आणि सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ. आर. आर. कोठावळे यांनी करून दिला. यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. व्यंकटेश गंभीर यांनी आधुनिक तंत्रज्ञान व संधी या विषयावर मार्गदर्शन करताना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेल्या विविध करिअर संधींबद्दल सविस्तर माहिती दिली.
50000विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे संशोधनात्मक दृष्टीकोनातून पाहावे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर इस्त्रोची कामगिरी सांगून डॉ. अब्दुल कलाम यांच्या बरोबर व्यतीत केलेल्या क्षणांचा मागोवा घेतला. त्यांच्या बरोबर संशोधन कार्य करतानाचे क्षण संस्मरणीय होते.कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी विज्ञानाच्या प्रगतीत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल पालके व डॉ. युवराज नवले यांनी केले तर आभार डॉ. डी. के. जमाले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या