महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय सैनिक स्कूल साठी निवड झालेली आहे यामध्ये चि वेदांत बाबासाहेब अंधारे यांने ३०० पैकी २७६ गुण मिळवले तर चि स्वराज विशाल नवले ३०० पैकी २४५ गुण मिळवले आहेत. महाराष्ट्र विद्यालयातील या दोन्ही विद्यार्थ्यांनी अत्यंत कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव , उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे साहेब, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी. पाटील , सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य अरुणजी देबडवार , खजिनदार जे. सी. शितोळे बापू,शाळा समिती सदस्या डॉ.सौ. मीराताई यादव मॅडम, शाळा समिती सदस्य शेळवणे बापू, संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के. डी. धावणे मॅडम, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी. साठे मॅडम, पर्यवेक्षक मदने के.जी., सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.




