छत्रपती ग्रुपने सामाजिक उपक्रमातून समाजापुढे ठेवला चांगला विचार व आदर्श – तहसीलदार शेख
नगर पालिका शाळेला आर ओ प्लांट व वॉटर कूलरचे वितरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील छत्रपती ग्रुपने आजवरच्या आपल्या सामाजिक उपक्रमातून समाजापुढे चांगला विचार व आदर्श समाजापुढे ठेवला आहे. इतर संस्था व मंडळांसाठी हे कार्य प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार तहसीलदार एफ आर शेख यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती ग्रुपच्यावतीने यशवंतराव चव्हाण नगरपरिषद शाळा क्र. १५ येथे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा आर ओ प्लांट तसेच थंड पाण्यासाठी वॉटर कूलर बसविण्यात आला. या प्लांटच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षीय मनोगतात तहसीलदार एफ. आर. शेख म्हणाले, समाजातील काही संस्था समाजातून देणगी गोळा करतात. परंतु, प्रत्यक्षात काम कमी व देखावा जास्त असे स्वरूप असते. छत्रपती ग्रुप मात्र याला अपवाद असून समाजातील गरजू घटकांसाठी काम करत आहे.
माजी सभापती रणवीर राऊत म्हणाले, पालिकेची सीबीएसई माध्यमाची शाळा आगामी काळात सुरू होत आहे. शिक्षक बांधवांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. न पा शाळांच्या कांही अडचणी असतील तर त्यांनी निःसंकोचपणे पुढे यावे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे आवाहन केले. छत्रपती ग्रुपच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजय उर्फ टिंकू पाटील म्हणाले, सन २०१० पासून छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेत आहोत. समाजातील गरीब, गरजू मुलींच्या नावे ५ हजार रुपयांची मुदत ठेव, गरजू महिलांना पिठाची चक्की, विविध शाळांना आर ओ प्लांट, सायकल वाटप, पूर प्रसंगी मदत कार्य असे अनेक समाजोपयोगी उपक्रम आजवर राबविले आहेत. न. पा शाळातील विद्यार्थ्यांना थंड व निर्जंतुक शुद्ध पाणी मिळावे या हेतूने या शाळेत हा प्लांट बसविल्याचे सांगितले.
यावेळी सचिन वायकुळे यांनी प्रेरणादायी विचार व्यक्त केले. न प शाळेच्या मुख्याध्यापिका घाडगे यांनी छत्रपती ग्रुपचे आभार मानले. याप्रसंगी नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, जेष्ठ नगरसेवक विजय राऊत, माजी सभापती रणवीर राऊत, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, सपोनि दिलीप ढेरे, गटनेते विजय चव्हाण, न पा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी बावकर, शिक्षण सभापती भारत पवार, बांधकाम सभापती दिपक राऊत, पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे, वैद्यकीय अधीक्षक शितल बोपलकर, राकेश तातेड, गणेश गोडसे, माणिक हजारे, सुरेश शिंदे यांच्यासह छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष हरीश डाके आणि कार्याध्यक्ष सचिन शिंदे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नियोजन आणि परिश्रम हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती ग्रुपचे : 2026 चे कार्यक्रमाचे अध्यक्ष : बापूसाहेब पवार उपाध्यक्ष : हरिश डाके कार्याध्यक्ष : सचिन शिंदे जय शिवराय प्रतिष्ठान अध्यक्ष विजय राऊत गणेश हांडे, अमोल डिसले, कुमार माळी, सचिन राऊत, अमोल पाटील, युवराज ढगे, राहुल बारंगुळे, दत्ता मुकटे, मयूर पवार, अखिल पठाण, विनोद काकडे, सागर थोरात, श्रावण भालेराव, संदीप पवार, केतन उपळकर, वैभव योगे, समाधान राऊत, पवन गाजरे, रोहन भगत अभिजीत चव्हाण ,पृथ्वीराज पाटील, सचिन सुपेकर, दत्ता गात नागेश मोहिते, आलिम मणियार, अक्षय गुळवे, प्रसाद परीट यांच्यासह ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी या कार्याचे भरभरून कौतुक केले.





