आंदोलनकृषीमहाराष्ट्रसोलापूर

कांदा आंदोलन पेटले शेतकऱ्यांनो कांदा लुटीचे लीलाव बंद पाडा..शंकर गायकवाड

सोलापूर बाजार समितीमध्ये आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व विविध जिल्ह्यातील शेतकरी.

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

दोनशे ते तीनशे रुपयाने लिलाव वाढवून पुकारल्यानंतर आंदोलन मागे

सोलापूर : ३ मार्च, कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल २००० च्या पुढे होत असताना, दर २०० ते ८०० रुपये पर्यंत कमी झाला असल्यामुळे राज्यभर कांद्याची आंदोलने सुरू झालेली आहेत. आज पुन्हा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या सोलापूर बाजार समितीवर मोर्चा काढून कांद्याचे लिलाव बंद पाडून दिवसभर बाजार समितीमध्ये विविध स्वरूपाची आंदोलनेही करण्यात आली.

त्यावेळी शरद भालेकर, राम हाके, रामराव काटे, रामहरी तेजगुडे, आबासाहेब नलगे, भीमराव झांबरे, विजयसिंह नाईकनवरे, दत्तात्रय ठोंबरे, आप्पासाहेब मोरे, अंबादास जगताप, बाबासाहेब लोखंडे, अंकुश नलगे, सागर चव्हाण, आप्पासाहेब वीर, नागनाथ मोरे, नितीन शिंदे आदिंसह अनेक जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 5000

यावेळी शंकर गायकवाड यांनी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव व चालू नुकसानी पोटी प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान सरकारने तात्काळ खात्यावर जमा करण्याची मागणी करून, राज्यातील ज्या ज्या बाजार समितीमध्ये कांदा लुटीचे लिलाव सुरू असतील ते लिलाव व बाजार समित्या बंद पाडाव्या असे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आवाहन केले.

कांद्याचे दर दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढवून पुकारल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. शेवटी विविध मागण्यांचे निवेदन बाजार समितीचे सचिव अतुलसिंह राजपूत यांनी स्वीकारले तर आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय अवताडे व शहाजी दुधाळ यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला.500000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button