पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

प्रताप दराडे यांना राज्यस्तरीय “गावगाडा” पुरस्कार जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : बार्शी शहर व परिसरात गेली तब्बल तीस वर्षे सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे प्रताप दराडे सर मॉडेल हायस्कूल बार्शी यांना विश्वकर्मा तरुण मंडळ वडशिवणे ता. करमाळा, जि. सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “गावगाडा” सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्काराचे 16 वर्ष आहे.

दराडे यांनी सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि आनंद यात्री प्रतिष्ठान तसेच इतर सामाजिक संस्था व मॉडेल हायस्कूल बार्शी यांच्या माध्यमातून विविध सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले. गेली 21 वर्षे विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांना कैलासवासी बाबुरावजी दिसले जीवनगौरव पुरस्कार, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, प्रत्यक्ष निसर्ग चित्र स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा युवकांमध्ये क्रीडा, शैक्षणिक संस्कृती रुजविणे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारे उपक्रम यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.5000प्रताप दराडे यांना राज्यस्तरीय “गावगाडा” पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कापसे, वार पी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चेतन देसाई, मॉडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक नागनाथ देवकते सर तसेच विविध सामाजिक संस्था, मान्यवर, मित्रपरिवार व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button