बार्शीमहाराष्ट्र

ग्रामीण भागातील शेताकऱ्यांचे शेतरस्त्याचे वाद विवाद मिटविण्यासाठी आमदार राजाभाऊ राऊत थेट बांधावर….

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील कव्हे येथील कव्हे ते पानगाव हा रस्ता ५० वर्षापासून प्रलंबित होता. बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी ३०/५४ योजनेअंतर्गत ८० लाख रूपये रस्त्यासाठी मंजूर केले होते, परंतु हा रस्ता शेताच्या बांधावरील व व्यक्तिगत वाद यामुळे बंद होता. या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने या परिसरातील शेतकरी व वाड्या वस्त्यांवर रहाणारे शेतकरी ही चिंतेत होते मात्र आमदार राजाभाऊ राऊत यांनी शेताच्या बांधावर जाऊन या रस्त्याचा वाद असणाऱ्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांमध्ये बोलुन हा वाद सोडविला त्यामुळे रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी आमदार राजाभाऊ राऊत यांचे आभार मानले.यावेळी डॉ.सर्जेराव माने, उपसरपंच वैभव शिंदे, चंद्रकांत तिकटे, विठ्ठल हजारे, सचिन माने, बाबासाहेब पाटील, माणिक तिकटे, अभिजीत देशमुख, सिद्धेश्वर हजारे, भगवान लोकरे, राहुल तिकटे, माणिक पाटील, कनिष्ठ अभियंता निलेश खळदकर तसेच कव्हे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button