सोलापूर जिल्हाप्रमुख पदी चाँदपाशा शेख
सोलापूर येथील बार कौन्सिल हॉलमध्ये सी.बी. शेख यांना नियुक्तीचे पत्र देताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व इतर
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर/बार्शी : सोलापुरातील आदर्श नगर, शेळके येथील एडवोकेट चाँदपाशा बासुमियाँ शेख यांची, सोलापूर येथील बार कौन्सिल हॉलमध्ये शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी शेतकरी संघटनेच्या वकील आघाडीच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली, त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख विजय रणदिवे, बार्शी तालुका अध्यक्ष शरद भालेकर, रामहरी पेजगुडे, युवा जिल्हाध्यक्ष मोसिन महमूद पटेल, एडवोकेट बापूसाहेब देशमुख, एडवोकेट रोहिदास पवार, एडवोकेट असीम बागी, एडवोकेट संजय गायकवाड, एडवोकेट बि.डी. मनसावले, एडवोकेट डी.एन. मैंदरकर, एडवोकेट असिफ शेख, एडवोकेट संजय काळे आदींसह बहुसंख्य वकील व शेतकरी उपस्थित होते.
एडवोकेट चाँदपाशा शेख हे गोरगरिबांच्या केसेस अत्यल्प फीमध्ये लढवत असल्यामुळे त्यांची शेतकरी संघटनेच्या वकील आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली असल्याचे शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना यावेळी सांगितले.





