न्यू हायस्कूल बार्शीच्या विद्यार्थ्यांचे कुर्डूवाडी येथील राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत घवघवीत यश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : आर. जी. ग्रुप युवक महोत्सवाच्या वतीने कुर्डूवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळाच्या न्यू हायस्कूल (शेठ अगरचंद कुंकुलोळ हायस्कूल), बार्शी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी त्रिपुरा राज्यातील पारंपरिक लोकनृत्य “होजागिरी” सादर करत आपल्या उत्कृष्ट कलागुणांचे दर्शन घडवले. या सादरीकरणाच्या जोरावर त्यांनी उत्तेजनार्थ चौथा क्रमांक पटकावून शाळेच्या नावलौकिकात मानाची भर घातली.

होजागिरी हे रेयांग (ब्रू) जमातीचे प्रसिद्ध लोकनृत्य असून संतुलन, लवचिकता आणि सौंदर्य यांचा अद्भुत संगम या नृत्यात पाहायला मिळतो. डोक्यावर मातीची भांडी ठेवून तसेच हातात दिवे सांभाळत विद्यार्थिनींनी सादर केलेले नृत्य प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक हालचाली, तालबद्ध सादरीकरण आणि भावपूर्ण अभिनयामुळे परीक्षकांनीही या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

या यशामागे मार्गदर्शक शिक्षक अरविंद कोळी सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, कोरिओग्राफर सौरव कांबळे यांची कलात्मक मांडणी, रूपाली मॅडम यांचे पारंपरिक व आकर्षक वेशभूषा नियोजन तसेच वेशभूषा व्यवस्थेसाठी मिळालेले सहकार्य मोलाचे ठरले. या यशाबद्दल संस्थेचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक आणि खजिनदार मोहन बुचडे सर यांनी विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन होताच विशेष अभिनंदन करून त्यांच्या कलेचे आणि परिश्रमांचे मनापासून कौतुक केले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या