निवडबार्शीमहाराष्ट्र

सुर्डीचा अक्षय काळे कर निरीक्षक पदी राज्यात चौथा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. खरतड अशा परीक्षांना सामोरं जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. सुर्डीमधील अक्षय काळे याने देखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे. अक्षय काळे याने परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून चौथा क्रमांक पटकवला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील सुर्डीचा अक्षय काळे याला घवघवीत यश मिळालं आहे. एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. काही विद्यार्थ्यांना यश संपादन होते तर काही विद्यार्थ्यांना अनेकदा वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते. सरकारी नोकरी किंवा सरकारी अधिकारी व्हावे, अशी इच्छा अनेक तरुणांची असते. अक्षय तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑक्टोबर २०२३ च्या परीक्षेचा निकाल लागला. यात अक्षय ला २९० मार्क मिळाले आहेत. या गुणांसह अक्षय राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. अक्षयच्या या यशाबद्दल त्याचे सर्व ग्रामस्थ,मित्र परिवार, नातेवाईक यांच्या कडून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button