गॅस कनेक्शनच्या मागणीसाठी उपोषण; तहसील कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : गौडगांव येथील सौ. आशा उमराज सुतार यांनी नवीन गॅस कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर एक दिवस उपोषण केले. गॅस कनेक्शन नसतानाही त्यांच्या बँक खात्यात गॅस सबसिडी (अनुदान) जमा होत असल्याने त्यांना नवीन गॅस कनेक्शन मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे तात्काळ नवीन गॅस कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी त्यांनी उपोषणाचे आंदोलन केले.
दरम्यान, तहसील कार्यालय बार्शी येथील पुरवठा विभागाने संबंधित गॅस एजन्सीला आशा उमराज सुतार यांना तात्काळ नवीन गॅस कनेक्शन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतचे लेखी पत्र तहसील कार्यालयाकडून देण्यात आले.
तहसील कार्यालयाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर आशा उमराज सुतार यांनी आपले एक दिवसाचे उपोषण मागे घेतले. यावेळी पुरवठा अधिकारी आठवले साहेब, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, अशोक माळी, पांडुरंग घोलप, सतीश बुरगुटे आदी उपस्थित होते.![]()




