आरोग्यमहाराष्ट्रसोलापूर

ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे आठ बालकांवर टंग टाय रिलीज शस्त्रक्रिया यशस्वी

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया

B1न्यूज मराठी नेटवर्क500

मंगळवेढा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्रक्रिया शिबिरात आठ बालकांवर टंग टाय रिलीज शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. या उपक्रमामुळे जिभेच्या हालचालींमध्ये अडथळा येणाऱ्या बालकांना दिलासा मिळाला असून, बालकांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर यांनी या उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन केले.

जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथील जनरल सर्जन डॉ. महेश कोडलकर, ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथील भूलतज्ज्ञ डॉ. उत्तम फुले आणि ग्रामीण रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. सूरज साठे यांनी आठही बालकांवर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या.500

टंग टाय म्हणजे काय?

टंग टाय ही जन्मजात अवस्था असून, यामध्ये जिभेखालील फ्रेन्युलम हा पातळ ऊतींचा तंतू लहान किंवा घट्ट असल्यामुळे जिभेच्या हालचालींवर मर्यादा येतात. परिणामी, काही बालकांना स्तनपान करताना अडचणी येऊ शकतात, तर काही मुलांना मोठे झाल्यानंतर बोलताना विशिष्ट अक्षरांचे उच्चार करण्यात त्रास होऊ शकतो. योग्य वैद्यकीय तपासणीनंतर आवश्यकतेनुसार करण्यात येणाऱ्या टंग टाय रिलीज शस्त्रक्रियेमुळे जिभेची हालचाल सुधारण्यास आणि संबंधित अडचणी कमी करण्यास मदत होऊ शकते.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिका वैशाली शिंदे, तेजश्री मेटकरी आणि रुपाली कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चौगुले, डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ. प्रवीण माने, डॉ. ऋतुजा गायकवाड, डॉ. स्नेहा गंदगे आणि डॉ. धनश्री केंदुळे यांच्यासह औषधनिर्माण अधिकारी रेश्मा सरडे, अविनाश पट्टणशेट्टी, विवेकानंद कसबे, आरोग्य सेविका सुरेखा खरात, सुनीता सातालोलू, पूजा वागदरकर तसेच श्री. चनशेट्टी, शाहीन तांबोळी, माधुरी गायकवाड, बाबासाहेब शिवशरण, माने आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

ग्रामीण भागातील बालकांना आवश्यक वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले. आरोग्य विभागाच्या विविध घटकांतील समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बालकांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देण्याचा शासनाचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button