गोदियाबँकिंगमहाराष्ट्र

बेरोजगारांसाठी मोबाईल दुरुस्तीचे मोफत प्रशिक्षण

B1न्यूज मराठी नेटवर्क

गोंदिया : बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कुडवा गोंदिया द्वारे जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवतींना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित करण्यात येतात. स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने आजपर्यंत 10 हजार 109 ग्रामीण व्यक्तींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी 7 हजार 673 व्यक्तींनी मिळविलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे स्वयंरोजगार सुरु केला आहे.

बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगार 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींकरीता ‘मोबाईल दुरुस्ती’ या व्यवसायाचे 30 दिवसीय मोफत प्रशिक्षण संभाव्य 29 जानेवारी 2026 पासून सुरु होणार आहे. परंतु आरसेटीला कोर्स सुरु करण्याकरीता कमीत कमी 30 ते 35 उमेदवारांची गरज असते. तसेच या संस्थेमध्ये विविध प्रकारचे कोर्स नि:शुल्क असून राहण्याची व जेवनाची नि:शुल्क सोय प्रशिक्षण संस्थेतच करण्यात येत आहे. त्याकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इच्छुक व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने व लवकरात लवकर संस्थेत येवून आपले नाव नोंद करावेत.

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेजारोजगारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वाहणे पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंप जवळ, तिरोडा रोड, कुडवा गोंदिया येथे त्वरित जमा करावे, असे संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी 8999371797, 8698140105, 9834895077 यावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button