रातंजन येथे ‘खेळ पैठणीचा व न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद १६ जानेवारी २०२६
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : श्रमजीवी बहुउद्देशीय क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ रातेजन संचलित, आदर्श विद्यालय रातंजन येथील शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून ‘हळदीकुंकू, मनोरंजन व बक्षिसांची लयलूट’ असणारा ‘खेळ पैठणीचा व न्यू होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेच्या मुख्याध्यापिका आणि माजी सरपंच आदरणीय सौ. उर्मिलाताई साहेबराव देशमुख यांनी भूषवले. तर प्रमुख पाहुण्या म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ. धाराशिव’च्या सरचिटणीस व माजी नगरसेविका सौ. प्रेमाताई सुधीर पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला ‘कारभारी लयभारी’ फेम अभिनेत्री नीता देव ख्रिस्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, ज्यांनी आपल्या शैलीत महिलांशी संवाद साधत कार्यक्रमाची रंगत वाढवली. त सूत्रसंचालन प्रा. डी. व्हि. जाधवसर यांनी खुमासदार शैलीत केले.
विविध स्पर्धा आणि बक्षिसांची लयलूट कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि गणेश वंदनेने झाली. आदर्श विद्यालय रातंजन च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी कुमारी श्रेया देशमुख व कुमारी श्रावणी देशमुख व त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी गणेश वंदना नृत्य सादर केले. त्यानंतर उपस्थित महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ‘एलईडी टीव्ही’, च्या मानकरी महादेवी मिथुन चव्हाण (रातंजन) ठरल्या तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ‘पैठणी’च्या मानकरी तनुजा जब्बार आतार (रातंजन) तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस ‘मिक्सर’च्या मानकरी सुजाता कोल्हे वैराग या ठरल्या. अशा आकर्षक बक्षिसांचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक महिलांनी या खेळात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
प्रत्येक सहभागी खेळाडू स्पर्धक महिलेसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. सुमारे दीडशे महिलांनी यात स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून सौ. अश्विनीताई घोंगडे (विघ्नहर्ता मंगल कार्यालय), सौ.विमलताई देशमुख, जेबुन शेख (शिक्षिका), स्वाती जाधव (उमेद अभियान), अनिता भोसले, चंदा राणी भोसले, मंजुश्री भोसले , वैशाली दळवे, व नीता ताई पडवळ यांसह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. उर्मिलाताई देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद, भोसले सर दळवे सर बनसोडे सर नाईकल सर व माळी सर , महेश देशमुख तसेच कर्मचारी कांता डोळसे ,सुहास ताटे, धनराज पवार, नार्वे योगेश बिले आणि संयोजक सौ. सफुरा आतार व सौ. शहनाज आतार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहेबराव देशमुख मित्र मंडळ रातंजन या मित्र मंडळाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
रातंजन, मुंगशी ,मालेगाव, आंबेगाव, हत्तीज, हिंगणी, जवळगाव v वैराग इत्यादी परिसरातील शेकडो महिलांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने दिमाखदार ठरला.
वैराग प्रतिनिधी – गौतम नागटिळक





