व्हॉईस ऑफ मीडिया, बार्शी तालुका शाखेच्या वतीने पत्रकार दिन साजरा

0

ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न50000

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी साप्ताहिक दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉईस ऑफ मीडिया, बार्शी तालुका शाखेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव नागेश चव्हाण हे होते. प्रमुख उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीतल बोपळकर, डॉ. राहुल मांजरे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र भापकर, पोलीस उप निरीक्षक सुधीर गुळमे, प्रशांत कथले उपस्थित होते.

पत्रकार दिनानिमित्त खालील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला —

गणेश गोडसे (दैनिक पुढारी)

चंद्रकांत करडे (दिव्य मराठी)

किरण आवारे (दैनिक पुण्यनगरी)

संजय बारबोले (संपादक – एस.बी. न्यूज)

विनोद ननवरे (संपादक – माझा न्यूज)

या कार्यक्रमाचे आयोजन व्हॉईस ऑफ मीडिया, बार्शी तालुकाध्यक्ष अस्लम काझी, सुशेन डमरे (सचिव), राहुल गुरव (उपाध्यक्ष), निलेश उबाळे (कार्याध्यक्ष), अमीन गोरे (प्रसिद्धी प्रमुख) व संतोष राजगुरू (खजिनदार) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार गणेश गोडसे यांनी व्हॉईस ऑफ मीडियाने दिलेल्या सन्मानाबद्दल आभार मानत, “यापुढेही आम्ही अधिक जोमाने कार्य करत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू,” असे सांगितले.

यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे सत्य निर्भीडपणे मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. प्रशासनातील त्रुटी निदर्शनास आणून त्या दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडण्याचे काम पत्रकार करतात. अध्यक्षीय भाषणात नागेश चव्हाण म्हणाले की, राजकारणात योग्य निर्णय व चांगल्या कामाची पोचपावती मिळण्यासाठी प्रामाणिक, अचूक आणि निर्भीड पत्रकारितेची नितांत गरज आहे.

तर सुशेन डमरे यांनी सांगितले की, व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या प्रश्नांसाठी कार्य सुरू असून, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य विमा, शिक्षणविषयक मदत तसेच विविध प्रश्न शासनदरबारी मांडून निर्णय घेण्यास संघटनेला यश आले आहे.

या कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे सदस्य सागर गरड, संजय बोकेफोडे, काशीनाथ क्षिरसागर, असिफ मुलाणी, गणेश आडसुळ, अजिम शेख, नितीन गाढवे, मुज्जमिल कौठाळकर, सुरज चंदनशिवे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन काशीनाथ क्षिरसागर यांनी केले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या