वैराग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कालीदास देवकते तर उपाध्यक्षपदी काशीनाथ क्षीरसागर यांची निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : वैराग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कालीदास देवकते तर उपाध्यक्षपदी काशीनाथ क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. वैराग येथील आयोजित पत्रकार परिषदेत बलभिम लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
यावेळी राहूल दळवी , किरण आवारे , आनंदकुमार डुरे, आदी मान्यवर उपस्थित होते तसेच रामदास पवार सचिव , बलभिम लोखंडे संघटक , आण्णासो कुरूलकर खजिनदार, सुजित काकडे सहसचिव , सुरज शिंदे प्रसिद्धी प्रमुख तर सदस्यपदी राहूल भालशंकर, संतोष राजगुरू यांची निवडी करण्यात आली आहे.
यावेळी संघाच्या वतीने वार्षिक नियोजन करण्यात आले तसेच पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावणे व विविध सामाजिक उपक्रम आयोजन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पवार यांनी केले तर आभार सुजित काकडे यांनी मानले.




