जयंतीबार्शीमहाराष्ट्र

सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल बार्शी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील के.एल. ई. सोसायटी बेळगांवी संचलित, सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या प्रांगणात जमले होते. शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन इयत्ता 5 वी ड चे विद्यार्थी कु.रिझा काझी व चि.जयदीप मिरगणे यांनी केले. इयत्ता 5 वी ड वर्गातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवन व कार्यावर आधारित भाषणे, नृत्य, नाटक सादर केले. तसेच सावित्रीबाई यांचे संपूर्ण शैक्षणिक ,सामाजिक कार्य ,जीवनदर्शन एका प्रसंगातून सादर केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्गशिक्षिका सौ.ज्योत्स्ना देवगुंडे मॅडम यांनी केले.

मुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवन ,शिक्षण, सामाजिक कार्याबद्दल विशेष प्रोत्साहित मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे उप मुख्याध्यापक महेश गोदेपुरे सर, पर्यवेक्षिका सौ .अनुराधा विश्वेकर मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. शुभांगी म्हमाणे मॅडम उपस्थित होते. सुंदर फलकलेखन ऐनापुरे सर यांनी केले. तसेच होनराव सर व भडुळे सर यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले .सौ.ज्योत्स्ना देवगुंडे मॅडम यांनी आभार मानले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button