सोलापूर जिल्ह्यातील खुल्या जागांच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदी रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास गेल्या काही दिवसांपासून अकृषिक रेखांकनातील खुल्या जागा (ओपन स्पेस) बेकायदेशीरपणे विकल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गंभीर विषयावर आज दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील खुल्या जागांच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदी रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, तहसीलदार महसूल दिनेश पारगे, तहसीलदार बार्शी एफ आर शेख तसेच सहाय्यक संचालक नगररचना विभाग, अधीक्षक भूमी अभिलेख घोडके आणि दुय्यम उपनिबंधक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, नियमानुसार मंजूर रेखांकनातील खुल्या जागांची खरेदी-विक्री करता येत नाही. तरीदेखील काही विकसकांकडून अशा जागांचे बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचे तक्रारींमधून स्पष्ट झाले आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत दुय्यम निबंधकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, खरेदी-विक्री दस्त नोंदणी करताना रेखांकन तपासून खुल्या जागेचा व्यवहार होत नाही याची खात्री करावी. तसेच तलाठी व नगर भूमापन अधिकारी यांनीही अशा नोंदी घेताना खुल्या जागेचा दस्त नसल्याची खात्री करावी. जर अशा प्रकारचे दस्त नोंदणीसाठी आले तर संबंधित तहसीलदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यास त्वरित अवगत करावे.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सर्व तहसीलदारांना आपल्या स्तरावर बैठक घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश दिले. खुल्या जागेच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री झाल्यास अशा व्यवहारांच्या नोंदी रद्द करण्यात याव्यात तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या विषयावर प्राप्त तक्रारींची चौकशी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांकडून आणखी तक्रारी असल्यास त्या तहसीलदार महसूल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या