राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत एक्सलंट अबॅकस क्लास, बार्शीचे विद्यार्थी चमकले
स्पर्धेत राम उपळकरने अवघ्या 2 मिनिट 48 सेकंद मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात पहिला
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : व्हि. के. इन्स्टिट्यूट, बार्शी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अबॅकस आणि वेदिक गणित स्पर्धा अलीकडेच संपन्न झाली. या स्पर्धेत एक्सलंट अबॅकस क्लासचे विद्यार्थी अत्यंत यशस्वी ठरले आहेत.
स्पर्धेत राम उपळकरने अवघ्या 2 मिनिट 48 सेकंद मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आणि अबॅकस चॅम्पियन 2025 या बहुमानाने गौरवण्यात आले. याशिवाय आयुष कबाडे, प्रीतम कबाडे, सोहम लोंढे, भक्ती चव्हाण, ईश्वरी कानगुडे, लव्या परदेशी, भारती मस्तूद, आराध्या मगरूमखाणे, स्वरा मगरूमखाणे या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
आद्या कदम, सार्थक सूळ, श्रेयस सी. एस. यांनी द्वितीय तर प्रतीक कबाडे, साईप्रसाद कबाडे, प्रेम कबाडे, स्वरा क्षीरसागर, समृद्धी लोंढे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मानसी मस्तुद, स्वराज वांगधरे, केशव मस्तूद या विद्यार्थ्यांनी बेस्ट परफॉर्मन्सचे पारितोषिक मिळवले.
या सर्व विद्यार्थ्यांना सारिका कबाडे मॅडम आणि व्हि. के. इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर वनुजा कबाडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनोद कबाडे, संजय निरंजन ,गुरू भांगे प्रा.शिवराज पाटील ,प्रा. डॉ .राहुल पालके, प्रा. ज्योती डोळस यांनी अभिनंदन केले, तसेच विविध संस्था, संघटना आणि समाजातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




