कै. बाबुरावजी डिसले जीवन गौरव पुरस्कार २०२५-२६ जाहीर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित कै बाबुरावजी डिसले स्मृती जीवन पुरस्कार व कै शिवाजीराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना गेल्या बावीस वर्षांपासून दिले जातात.यावर्षी सन २०२५-२६ चे पुरस्कार जाहीर झाल्याचे सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कापसे यांनी सांगितले.

या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व बुके असे आहे. या पुरस्काराचे वितरण स्व.शिवाजीराव डिसले शेठ यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता अर्णव शैक्षणिक संकुल, सासुरे फाटा, वैराग ता बार्शी येथे होणार आहे.

कृषी क्षेत्रासाठी सूर्यकांत क्षीरसागर, महिला भूषण पुरस्कार म्हणून राणूबाई जगताप, इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकारितेतून प्रदीप कापसे, विजय निलाखे यांना पत्रकारिता पुरस्कार, साहित्य क्षेत्रातील कामगिरी निमित्त भीष्माचार्य चांदणे, युवा उद्योजक गणेश शालगर, नझीर शेख शैक्षणिक पुरस्कार, क्रीडा पुरस्कारासाठी किरण देशमुख, भगवंत साळवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, ह.भ.प. तुकाराम मस्के यांना अध्यात्मिक पुरस्कार, कला पुरस्कारासाठी शशिकांत लांडगे तर सामाजिक पुरस्कार प्रसाद मोहिते यांना जाहीर झाला आहे. अशाप्रकारे विविध बारा क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव प्रताप दराडे यांनी दिली.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या