रातंजन येथील आदर्श विद्यालयात आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न , 27 हजाराची उलाढाल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील आदर्श विद्यालयात आनंद बाजाराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक नागटिळक महाराज यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. उर्मिला देशमुख, हनुमंत (भाऊ) देशमुख, लक्ष्मण (तात्या) देशमुख, विजयकांत देशमुख, ज्ञानबा जाधव, मराठी शाळेचे मुख्याध्यापक कुरुंद सर, शिक्षक स्टाफ, नायकल सर, माळी सर , दळवी सर ,श्रीमती सपुरा आतार, श्रीमती शहनाज आतार, गावातील तरुण वर्ग, महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

आनंद बाजारामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, भाजीपाला, विक्रीचे विविध स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांनी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आनंद बाजारात 25 ते 27 हजाराची उलाढाल झाली.

कचोरी, भेळ, शेंगालाडू, वडापाव यासह अनेक खादयपदार्थ विक्रीस उपलब्ध होते. भाजीपाला, शालेय साहित्य, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने यासह अनेक वस्तूचे स्टॉल लावण्यात आले होते. यातून विद्यार्थ्यांच्या व्यवहार कौशल्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी आनंद बाजाराचा आनंद घेतला. सदर बाजारात विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

वैराग प्रतिनिधी – गौतम नागटिळक

50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या