उद्घाटनबार्शीमहाराष्ट्र

बार्शीने राष्ट्रीय खेळाडू घडविले : विजय नाना राऊत

राज्यस्तरीय निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन
कर्मवीर व्हॉलीबॉल चषक २०२५-२६

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखांनी राष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू घडविले असून, जो खेळाडू गुरुचा आदर राखतो तो खेळाडू नेहमी आघाडीवर राहतो असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध उद्योजक विजयनाना राऊत यांनी केले.

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंती निमित्त श्री शिवाजी महाविद्यालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन, व्हॉलीबॉल असोसिएशन सोलापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएम-उषा योजनेअंतर्गत आयोजित राज्यस्तरीय नियंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव होते. यावेळी सचिव प्रकाश पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, सहसचिव अरुण देबडवार,संचालक विष्णू पाटील, डॉ. दिलीप मोहिते, डॉ.विलास देशमुख, प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, माजी उपनगराध्यक्ष रमेश पाटील, नूतन नगरसेवक भारत पवार, संदेश काकडे तसेच डॉ. रामचंद्र जगताप, प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, प्राचार्य दीपक गुंड ,प्राचार्य विष्णू शिखरे ,प्राचार्य संजय कारंडे,आंतरराष्ट्रीय पातळीवरील पंच अनिल गिराम, डॉ. रमेश आजरी, चंदू पवार, प्रताप पाटील, किरण पाटील, जयकुमार बारंगुळे, प्रकाश मनगिरे, किरण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे राऊत म्हणाले की, युवकांनी शिक्षण घेत असताना क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. आपल्या बार्शीमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण झाले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. बी.वाय. यादव यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रेरणा घेऊन संस्थेकडून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. खेळाडूंनी मैदानवर आपले कौशल्य दाखवावे. स्पर्धेत जयपराजय होतच असतो, पण आपण खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी केले. तसेच सूत्रसंचालन डॉ. आसावरी फडतारे आणि प्रा. विजया जगताप यांनी केले, तर आभार डॉ. सोमनाथ यादव यांनी मानले.

पहिला सामना : खामगाव अ विरुद्ध मुंबई ब यांच्यात झालेल्या सामना खामगाव अ या संघाने पहिला सेट २५ -१९, दुसरा सेट २५-१७ या फरकाने जिंकला.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button