पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळा 2025: पोलीस आयकॉन पुरस्कारासाठी दिलीप ढेरे यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

सलग बाराव्या वर्षी आयोजित होणाऱ्या आणि राज्यभर गाजणाऱ्या युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या प्रतिष्ठित सोहळ्यात, मानाचा समजला जाणारा ‘राज्यस्तरीय पोलीस आयकॉन पुरस्कार’ यंदा बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रमुख व सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. दिलीप ढेरे यांना जाहीर करण्यात आला आहे.

पोलीस खात्यातील अतुलनीय कामगिरी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीचे त्यांचे योगदान तसेच विविध सामाजिक उपक्रमांत केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

दिलीप ढेरे यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस खात्याला अधिक पारदर्शक व प्रभावी बनवले आहे. गुन्हेगारीला आळा घालणे, नागरीकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे आणि समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांच्या कार्याची झलक पुरस्कार सोहळ्यातील विशेष चित्रफितीद्वारे सादर केली जाणार आहे. युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळा हा दरवर्षी आपल्या भव्यतेसाठी ओळखला जातो. यंदाही राज्यभरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या वर्षीच्या सोहळ्याची तारीख, स्थळ व वेळ लवकरच जाहीर केली जाईल.

युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळ्याने सलग बाराव्या वर्षीही उत्कृष्टतेचा वारसा कायम राखला आहे. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून, कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा आणि समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणारा ठरला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे बार्शी तालुक्याचा गौरव वृद्धिंगत झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button