क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध पोक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : शहरातील एका परिसरात एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात एका इसमावर पॉक्सो (POCSO) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला (वय ३० वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:०० ते ३:०० च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महिला कपडे धुण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या, तर त्यांची १२ वर्षे १० महिने वयाची मुलगी घरात एकटीच होती. याचा फायदा घेऊन आरोपी ( नांव – गोपनीय, रा. बार्शी) याने पीडित मुलीला आपल्या मोटारसायकलवर बसवून त्याच्या घरी नेले. त्यानंतर, आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.5000जेव्हा फिर्यादी महिला घरी परतल्या आणि मुलगी घरात दिसली नाही, तेव्हा त्यांनी परिसरात शोध घेतला. यावेळी आरोपीच्या घराच्या पाठीमागून पीडित मुलगी रडत धावत आल्याचे त्यांनी पाहिले. मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.50000

फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act): कलम ८, १२, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii), आणि ३(२)(va) प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून गांभीर्याने केला जात असून, पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button