क्रीडा विषयकबार्शीमहाराष्ट्र

भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात खो-खो विजयी संघाचा सन्मान सोहळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या वतीने बार्शी तालुकास्तरीय खो.खो स्पर्धा शिवशक्ती मैदान बार्शी येथे.तीन व चार सप्टेंबर 2024 रोजी नुकत्याच पार पडल्या. यात सतरा वर्षे मुलांचा संघ विजयी झाला,अन् बार्शी तालुक्यात पुन्हा विजयाचा दबदबा कायम केला. याच स्पर्धेदरम्यान 14 वर्षे मुलींचा गट उपविजेता ठरला. या विजयाचे कौतुक करण्यासाठी प्रशालेने या टीमचा सन्मान सोहळा करण्यात आला. या वेळी टीमला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक संतोष कुमार चिकणे, त्यांना सहकार्य करणारे सत्यवान माळी, तसेच क्रांतिसिंह माने,यांचा ही सन्मान करण्यात आला. या सर्व टीमला मार्गदर्शन करणारे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रमोद (पप्पु) देशमुख यांचाही प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सन्मान केला. या यशाचे कौतुक गुळपोळी परिसरात होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button