क्राईमप्रशासनबार्शीमहाराष्ट्र

बार्शी पोलिसांची धडक कारवाई; कोल्ड्रिंक्स गोडाऊन फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक, ६१ बॉक्स जप्त

बार्शी शहर पोलिसांनी कोल्ड्रिंक्स चोरी प्रकरणी अटक केलेले दोन आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल.

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी, दि. ६ जून २०२६ : बार्शी शहरातील सुभाष नगर परिसरातील एका कोल्ड्रिंक्स गोडाऊनमध्ये चोरी करून माल लंपास करणाऱ्या दोन आरोपींना बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत अटक केली असून, चोरीस गेलेल्या मालापैकी ६१ बॉक्स कोल्ड्रिंक्स हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप राजेश जगताप यांच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ८२ बॉक्स कोल्ड्रिंक्स चोरी करून नेले होते. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.5000गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. त्यातून अनिकेत राज कंगार आणि किरण मारुती पोहे (रा. पंकज नगर, बार्शी) या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ६१ बॉक्स कोल्ड्रिंक्स जप्त करण्यात आले. उर्वरित मालाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा मंजम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.599

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button