“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी e-KYC बंधनकारक; शासनाचे परिपत्रक जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य, पोषण सुधारणा आणि कुटुंबातील निर्णयक्षम भूमिकेला बळकटी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे आर्थिक मदत दिली जाते.
त्यांना आता शासनाच्या वेबसाईटवर जाऊन e-KYC करावी लागणार आहे.
शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार, योजनेतील पात्र महिलांची पडताळणी व प्रमाणीकरण (Verification & Authentication) e-KYC द्वारे Aadhaar Authentication च्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. e-KYC करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सद्य परिपत्रकाच्या दिनांकापासून पुढील २ महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणे बंधनकारक असून, यामध्ये अपयशी ठरणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील लाभ मिळणार नाही.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असल्यास, सर्व पात्र महिलांनी आपली e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
जर e -K Y C शासनाने दिलेल्या मुदतीत जर नाही पूर्ण केली तर त्यांचा लाभ रोखला जाऊ शकतो.”



