महाराष्ट्रमुंबई
अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर पाचव्या दिवशी उपोषण सोडलं

B1न्यूज मराठी नेटवर्क
आजाद मैदान, मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत मंत्रिमंडळ उपसमितीने सकारात्मक चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. यानंतर उपसमितीच्या विनंतीनुसार जरांगे यांनी आंदोलन थांबवलं. मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले हस्ते लिंबूपाणी घेवून जरांगे यांनी उपोषण सोडलं. याबद्दल त्यांचे आणि सर्व आंदोलकांचे उपसमितीने आभार मानले.
तसेच मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महायुती सरकारचे आभार व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्यक्त केली.



